भजनी मालिका
← भजनांकडे परत

न पुसतां संतां निघालाअ तेथुनी । पैलपार इंद्रायणी प्राप्त जाला

na pusatan santan nighalaa tethuni | pailapar indrayani prapta jala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न पुसतां संतां निघालाअ तेथुनी । पैलपार इंद्रायणी प्राप्त जाला ॥१॥ मागें पुढें पाहे पळत तांतडी । आला उठाउठी पंढरिसी ॥२॥ कळवळोनि कंठी धरिली विठल मूर्ती । नको देऊं हातीं निवृत्तीच्या ॥३॥ ज्ञानदेव सोपान बोलाविला गोरा । जुनाट म्हातारा जाळूं आला ॥४॥ मुक्ताईनें तेथें माजविली कळी । हे संत मंडळी कपटी तुझी ॥५॥ नामा म्हणे देव आणिलें पूर्व दैवें । गेलों असतों जीवें सगळाची ॥६॥