भजनी मालिका
← भजनांकडे परत

न पढावे वेद नको शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा

na padhave ved nako shastrabodh | namache prabandh path kara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न पढावे वेद नको शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥१॥ नव्हे ब्रह्मज्ञान न होय वैराग्य । साधा भक्तिभाग्य संत-संगें ॥२॥ येर क्रियाकर्म करितां हो कलीं । माजि कोण बळि त-रले सांगा ॥३॥ नामा म्हणे मज सांगितलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥४॥