भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुळींच मी जाणें तुझा ठेंगेपणा । काय नारायणा बोलसील

mulinch mi janen tujha thengepana | kay narayana bolasil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुळींच मी जाणें तुझा ठेंगेपणा । काय नारायणा बोलसील ॥१॥ पुरे पुरे आतां तुमचे आचार । मजशीं वेव्हा घालूं नको ॥२॥ लालुचाईसाठीं मागे भाजीपाना । लाज नारायणा तुज नाहींज ॥३॥ नामा म्हणे काय सांगों तुझी कीर्ती । वाउगी फजिती करूं तुज ॥४॥