भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणतां नाम वाचे वैकुंठ जवळी । नित्य वनमाळी भक्तांसंगें

mhanatan nam vache vaikunth javali | nitya vanamali bhaktansangen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणतां नाम वाचे वैकुंठ जवळी । नित्य वनमाळी भक्तांसंगें ॥१॥ होईल साधन विठठलीं परिपूर्ण । निवती नयन मूर्ति पाहतां ॥२॥ शंखचक्रांकित आयुधें शोभती । भाग्योदयीं दिसती भावशीळा ॥३॥ नामा म्हणे तें रुप पंढरीचें आहे । न सांडी ते सोय केशवाची ॥४॥