भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता पिता जन स्वजन कांचन । प्रियापुत्रीं मन गोवू नको

mata pita jan svajan kanchan | priyaputrin man govu nako

रचनाकार: संत रामदास · अभंग
माता पिता जन स्वजन कांचन । प्रियापुत्रीं मन गोवू नको ।। गोवू नको मन राघवेंवांचोनी । लोकलाज जनीं लागलीसे ।। लागलीसे परी तुवां न धरावी । स्वहितें करावी रामभक्ति ।। रामभक्तिविण होसिल हिंपुटी । एकलें शेवटीं जाणें लागे ।। जाणें लागे अंती बाळा सुलक्षणा । ध्याई रामराणा दास म्हणे ।।