भजनी मालिका
← भजनांकडे परत

मस्तकीं ठेवुनियां डेरा । करूं निघाली विकरा । साच करितसे पुकारा । म्हणे गोविंद घ्या वो

mastakin thevuniyan dera | karun nighali vikara | sach karitase pukara | mhane govind ghya vo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मस्तकीं ठेवुनियां डेरा । करूं निघाली विकरा । साच करितसे पुकारा । म्हणे गोविंद घ्या वो ॥१॥ बोल बोलती आबळा । तंव त्या हांसती सकळा । मुखीं पडियेला चाळा । या गोपाळाचा ॥२॥ दहीं म्हणावासे ठेले । वाचे गोविंद पैं आलें । चित्त चैतन्य रंगलें । कान्हु चरणीं बाई वो ॥३॥ उन्नतीये बोलती नेती । चालता गज गती । कान्हु वांचुनी चित्तीं । आणीक नेणें बाई वो ॥४॥ जाऊनियां बळीच्या द्वारां । त्रिपांड केली वसुंधरा । कैसा सावाला तुमच्या डेरा । दाखवी बाई वो ॥५॥ वृद्ध गौळणी पाचारिती । आणी वो अरुता श्रीपती । कोठें गोविंदु विकिती । नाहीं देखियला बाई वो ॥६॥ श्रीरंगी रंगला जीवु । म्हणे घ्यावो हा माधवु । बरवा रमापती गौरवु । साच आणियला कैसा ॥७॥ बाळा भरूनियां बाळा । देखे श्रीरंगु साव्ळा । बेधीं वेधल्या सकळां । गोपी गोविंदासवें ॥८॥ गोविंद म्हणा वाचे । गोविंद स्मरण करा साचे । दोष हरती जन्माचे । छंद लागला तयाचा ॥९॥ नामया स्वामी हो मुरारी । मज पाहतां अभ्यंतरी. । शेकी वापिलें निर्धारीं । मनुष्य्पण ॥१०॥