भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनीं जें जें देखें परी दृष्टी नेणें । प्रेमाची ते खूण जाणावया

manin jen jen dekhen pari drushti nenen | premachi te khun janavaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मनीं जें जें देखें परी दृष्टी नेणें । प्रेमाची ते खूण जाणावया ॥१॥ काय करूं माय बाप गा विठ्ठला । मजसि कां अबोला धरिलासी ॥२॥ मानसीं वसणें प्रत्यक्ष पाहणें । तुझें नाम गाणें तरी साच ॥३॥ नामा म्हणे किती सांगावें गा तुज । केशवा हें गुज पुरची माझें ॥४॥