भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन करी आपुलें वासना ते वारी । सर्व हेंचि हरी भजत जाय

man kari apulen vasana te vari | sarva henchi hari bhajat jay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मन करी आपुलें वासना ते वारी । सर्व हेंचि हरी भजत जाय ॥१॥ ब्रह्मनाम गोविंद नाहीं भेदाभेद । तुटे भवबंध हरी नामें ॥२॥ सांडी लगबग न करी तूं आळस । विठठलीं विश्वास असों देणें ॥३॥ नामा म्हणे ब्रह्म हेंचि निरुपण । सर्व काम पूर्ण याच्या नामें ॥४॥