भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन धांवे सौरावैरा । मन मारूनि केलें एकमोरा

man dhanve sauravaira | man maruni kelen ekamora

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मन धांवे सौरावैरा । मन मारूनि केलें एकमोरा ॥१॥ मन केलें तैसें होय । मन धांवडिलें तेथें जाय ॥२॥ मन लांचावलें न राहे । तत्त्वीं बैसलें कधिं नव जाये ॥३॥ नामा म्हणे सोहं-शुद्धि । मन वेधलें गोविंदीं ॥४॥