भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया मनें मज उपदेश केला । तो मज बिंबला ह्लदयकमळीं

majhiya manen maj upadesh kela | to maj bimbala hladayakamalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझिया मनें मज उपदेश केला । तो मज बिंबला ह्लदयकमळीं ॥१॥ निर्वाणींची एक सांगितली खून । कैवल्य चरण केशवाचे ॥२॥ वेदशास्त्र श्रुति आणीक पुराणें । पढोनि जाणणें हेंचि सत्य ॥३॥ क्रिय कर्म धर्म करणें ज्या कारणें । ते खूण निर्वाण चरण हेचि ॥४॥ जप तप अनुष्ठान करोनि साधन । प्रत्यक्ष निधान चरण हेचि ॥५॥ नामा ह्मणे मज कळलें अनुभवें । न विसंबें चरण जीवें तुझे ॥६॥