भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला

majha shinabhag gela | tuj pahatan viththala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला ॥१॥ पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥ अखंडित नामस्मरण । बाधूं न शके तया विघ्न ॥३॥ जनी म्हणे हरिहर । भजतां वैकुंठीं त्या घर ॥४॥