भजनी मालिका
← भजनांकडे परत

महिमा अगाध यात्रा कार्तिकीये । आला पंढरीये नामदेव

mahima agadh yatra kartikiye | ala pandhariye namadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
महिमा अगाध यात्रा कार्तिकीये । आला पंढरीये नामदेव ॥१॥ भक्त शिरोमणी पंढरीच्या नाथा । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥ धन्य नामदेव धन्य नामदेव । जिवीं तुझे पाव न विसंबे ॥३॥ भक्त सप्रेम मिळाले अपार । करिती गजर हरिनामीं ॥४॥ नटे महाद्वारीं झळके पताका । करिती ब्रह्मादिक पुष्पवृष्टी ॥५॥ नामघोष कानीं समस्त ऐकती । पाषान द्रवती तेणें प्रेमें ॥६॥ नामा म्हणे जीव निवालासे येथें । पाहतां विठोबातें श्रमु नेला ॥७॥