भजनी मालिका
← भजनांकडे परत

महा मुक्ति क्षेत्र तीर्थाचें तारक । उपमेसि आणीक नाही दुजें

maha mukti kshetra tirthachen tarak | upamesi anik nahi dujen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
महा मुक्ति क्षेत्र तीर्थाचें तारक । उपमेसि आणीक नाही दुजें ॥१॥ तें हें पंढरपूर प्रेमाचें भांडार । नामें निरंतर गर्जतसे ॥२॥ येवढें तीर्थ जवळी असतां पै समर्थ । कोण भाग्यहत दैन्य भाकी ॥३॥ जीवन्मुक्त ज्ञानी येथें पुंडलिक मुनि । बैसलासे ध्यानी परलक्षी ॥४॥ योग्यांचे ह्रदयींचे निजध्यान नेटकें । तें जयाचेनि सुखें वेडावलें ॥५॥ पुण्यपावन भीमा दक्षिणवाहिनी । अमृत संजीवनी पुण्यराशी ॥६॥ आनंदरसकुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा । दर्शनें न या गा गर्भवासा ॥७॥ स्वर्गीम मंदाकिनी लाजोनि राहिली । पाताळीं प्रवेशली भोगावती ॥८॥ सहस्त्रभाग भेणें होउनी भागीरथी । सागरा मिळती जाली वेगीं ॥९॥ भक्तजन भाग्याची कीं सुख आरोग्याची । जें कां वैराग्याची जन्मभूमी ॥१०॥ तेथें हरिखे निर्भर नामा संताचें संगतीं । गीतीं कीर्ति विठोबाची ॥११॥