भजनी मालिका
← भजनांकडे परत

मधुवन चांगलें लोचनीं देखीलें । तेथें मन रंगलें बाळकाचें

madhuvan changalen lochanin dekhilen | tethen man rangalen balakachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मधुवन चांगलें लोचनीं देखीलें । तेथें मन रंगलें बाळकाचें ॥१॥ राहूं येथें करूं देवाची प्रार्थना । म्हणोनियां मना बोधवीत ॥२॥ सरोवर दिव्य त्यामाजी कल्हारें । भोंवताले मयुर नाचताती ॥३॥ साउली सुंदर सुमनें मनोहर । देवाचा विहार तये ठायीं ॥४॥ नामा म्हणे ऐसा निश्चय नेमून । ध्रुव तये वनीं स्थिरावला ॥५॥