भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोपतां आदित्य पडे चंद्रप्रभा । वृंदावनीं शोभा सुशो-भित

lopatan aditya pade chandraprabha | vrundavanin shobha susho-bhit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लोपतां आदित्य पडे चंद्रप्रभा । वृंदावनीं शोभा सुशो-भित ॥१॥ देहुडा पाउलीं उभा तये वनीं । वेणू चक्रपाणी वाजवितो ॥२॥ ऐकतांचि नाद गोकुळींच्या नारी । पाहावया हरि निघताती ॥३॥ भ्रतार सेजेसी टाकुनी उठती । वाढितां पंगती निघताती ॥४॥ स्तन देतां बाळें टाकिलीं भूमीसी । मोकळिया केशीं निघताती ॥५॥ नामा ह्मणे ऐशा गेल्या देवापाशीं । आनंद मानसीं न समाये ॥६॥