भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावण्य सुंदर रूपानें बरवी । पापीण जाणावी ते कामिनी

lavanya sundar rupanen baravi | papin janavi te kamini

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लावण्य सुंदर रूपानें बरवी । पापीण जाणावी ते कामिनी ॥१॥ देखतां होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होये ॥२॥ ऐसी जे घातकी जन्म कासयाची । चांडाळीन तिसी नरकप्राप्त ॥३॥ नामा म्हणे तिचें पाहूं नये तोंड । पापीण ते रांड बुडवी नरा ॥४॥