भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिका मी गाईन लटिका मी नाचेन । संतासि देखोन लटिका लवें

latika mi gain latika mi nachen | santasi dekhon latika laven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लटिका मी गाईन लटिका मी नाचेन । संतासि देखोन लटिका लवें ॥१॥ लटिका माझा भाव लटिकी माझी भक्ति । तूं तंव श्रीपती कृपासिंधु ॥२॥ लटिकी माझी क्रिया लटिकें माझें कर्मा । परि सत्य तुझें नाम गातु असे ॥३॥ लटिकें माझें ध्यान लटिकें माझें ध्यान । तूं तंव सहजगुण सत्यरूप ॥४॥ लटिकी माझी पूजा लटिकें माझें स्मरण । लटिकें माझें भजन भावहीन ॥५॥ लटिकें प्रेमवत्स धेनु हें स्वीकारी । तैसें मज करीं म्हणे नामा ॥६॥