भजनी मालिका
← भजनांकडे परत

लपलासी तरी नाम कैसें नेसी । आम्ही अहर्निशीं नाम गाऊं

lapalasi tari nam kaisen nesi | amhi aharnishin nam gaun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लपलासी तरी नाम कैसें नेसी । आम्ही अहर्निशीं नाम गाऊं ॥१॥ आम्हांपासोनियां जातां नये तुज । तें हें वर्म बीज नाम घोकूं ॥२॥ आम्हांसी तों तुझें नामचि पाहिजे । मग भेटी सहजें देणें लागे ॥३॥ भोळीं भक्तें आम्ही चुकलों होतों वर्म । सांपडलें नाम नामयासी ॥४॥