भजनी मालिका
← भजनांकडे परत

लांब लांब काय सांगशील गोष्टी । करा उठाउठी निरभिमान

lamb lamb kay sangashil goshti | kara uthauthi nirabhiman

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लांब लांब काय सांगशील गोष्टी । करा उठाउठी निरभिमान ॥१॥ मी तूं पण जंव दंभ गेला नाहीं । साधिलें त्वां न कांहीं तत्त्वसार ॥२॥ अहंभाव देहीं प्रपंचाचे दृष्टी । काय चाले गोष्टी रोकडी ते ॥३॥ नामा ह्मणे ऐसें नेणती विचार । जाती निरंतर यमपंथें ॥४॥