भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाजलें गे माय आतां कोणा ओवाळूं

lajalen ge may atan kona ovalun

लाजलें गे माय आतां कोणा ओवाळूं । जिकडे पाहावें तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥ ओवाळूं मी गेलें माय गेले द्वारके । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज सारिखें ॥२॥ ओवाळूं मी गेलें माय सखिया माझारी । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज नरनारी ॥३॥ ओवाळूं मी गेलें माय सारंगधरा । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज परिवारा ॥४॥ वैजयंती गळां श्रीवत्सलांच्छन । विष्णुदास नामा येणें दाविली खूण ॥५॥