भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुटुंबासहित जावें जी दरुषणा । केलीसे प्रार्थना सिदोपंतीं

kutumbasahit javen ji darushana | kelise prarthana sidopantin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुटुंबासहित जावें जी दरुषणा । केलीसे प्रार्थना सिदोपंतीं ॥१॥ सहज बोळवण संतांचें दरुषण । म्हण केलें मान्य शीघ्र चला ॥२॥ मग विठठलानें मातापिता वंदियेली । स्थिति सांगितली सिदोपंतीं ॥३॥ चिरंजीव नांदा म्हणती मातापिता । सुख आमुच्या चित्ता थोर जालें ॥४॥ वस्त्रें अलंकार सिदोपंता दिधले । मग गमन केलें सिदोपंतीं ॥५॥