भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । करें घेऊनि सावकासी । आतां बहु भितो यासी

kusti khelatan kasavisi | shembud kharakaten nakasi | karen gheuni savakasi | atan bahu bhito yasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । करें घेऊनि सावकासी । आतां बहु भितो यासी ॥१॥ आम्ही तुम्ही सवें जेवूं । गाई वळावया जाऊं । त्याच्या मानेवर बुक्या देऊं । जवळ जावयासि आतां भिऊं ॥२॥ नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनि उभे राहूं । पायां पडूनि मागुनि घेऊं । जनीं वनीं तो कृष्ण ध्याऊं ॥३॥