भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत

kulal apalya gharin bhajavi bhachari | mhane jain hoil hari krupavant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥ हरीसि वरदळ लावितो निशिदिनीं । धाडिला म्हणोनि तुम्हांपाशीं ॥२॥ तुम्ही संतजन उद्धराल तत्काळ । नामा लडिवाळ विठोबाचा ॥३॥ राखावें तें ब्रीद करावें पावन । धान बोलावणें गोरोबाला ॥४॥ म्हणे मुक्ताबाई भाजलें कीं कोरें । काकाचें उत्तर सत्य मानूं ॥५॥