भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुबेराचे पुत्र मदोन्तत्त झाले । म्हणूनि शापिलें नारदानें

kuberache putra madontatta jhale | mhanuni shapilen naradanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुबेराचे पुत्र मदोन्तत्त झाले । म्हणूनि शापिलें नारदानें ॥१॥ व्हाल तुम्हीं वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥२॥ विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उश्याप वदत कृपाळुवा ॥३॥ कृष्णाचा चरण लागेल तुम्हांसी । आपुल्या स्थळासीं याल बेगीं ॥४॥ मोडितसे वृक्ष लक्ष्मीचा पती । दोघे निघताती दिव्य पुरुष ॥५॥ नामा म्हणे तेव्हां करिताती स्तुती । पापें दग्ध होती ऐकतांची ॥६॥