भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षेत्रीं हा वृत्तांत कळला सर्वाशीं । आले पंचक्रोशी सभोंवते

kshetrin ha vruttant kalala sarvashin | ale panchakroshi sabhonvate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
क्षेत्रीं हा वृत्तांत कळला सर्वाशीं । आले पंचक्रोशी सभोंवते ॥१॥ धोंडोबा गणोबा होते ज्याचे रानीं । ते आले धांवोनि मागावया ॥२॥ आपुलें द्र्व्य घ्यावें धोंडोबशीं द्यावें । नाहीं तरी चलावें पंचाइती ॥३॥ नामदेव म्हणे द्र्व्य तुम्ही द्यावें । आपुले घेवोनि जावें धोंडोबासी ॥४॥