भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे

kshan ek mana baisoni ekantin | vicharin vishranti kothen ahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे ॥१॥ लक्षचौर्‍यांशींच्या करितां येरझारा । शिणलसि गव्हारा वेळोवेळां ॥२॥ अझूनितुज लाज न वाट पैं कैसी । नर-काचे द्वारांसि जावें किती ॥३॥ दुर्लभ आयुष्य मनुष्य देहिंचें । जातसे मोलाचें वांयांविण ॥४॥ खापराचे साठीं सांडिला परिस । गहिंवरें फुटतसे ह्लदय माझें ॥५॥ पुत्रकलत्रादिक सुखाचीं सोयरीं । त्यांची ममता थोरी धरिली तुबां ॥६॥ अनुदिनीं पाळितां अनुभवेंचि पाहे । कोण सुख आहे तयाजवळीं ॥७॥ जगाचा जीवलग मायबाप आपुला । तो तुवां दुराविला कोशिराज ॥८॥ स्वप्रींचिया धना लुब्ध-लसि काय । आलें काळभय हाकित तुज ॥९॥ संतापाचें सदन शोकाचे पुतळे । ते त्वां मानियले हितकारी ॥१०॥ कैंची सुख निद्रा इंगळचि शेजे । प्रत्यया आणूनि तुझें तूंचि पाहीं ॥११॥ तुज राखेल कोण येवढिये संकटीं । रिघसी ज्याचे पोटीं मरणाभेणें ॥१२॥ आ-दिमध्य अवसानीं सोडविल निर्वाणीं । तया चक्रपाणी सेविं वेगीं ॥१३॥ जो जो क्षण लविसी हरिभजनाकडे । तो तो गांठीं पडे सार्थकीं रे ॥१४॥ नामा ह्मणे तुजचि येतों कत्कुळती । सोडिंरे संगती वासनेची ॥१५॥