भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णभक्तीविण तरला आहे कोण । द्यावा निवडून एक तरी

krushnabhaktivin tarala ahe kon | dyava nivadun ek tari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्णभक्तीविण तरला आहे कोण । द्यावा निवडून एक तरी ॥१॥ कार्य आणि कारण लटका हा शीण । वर्म न कळोन वांयां गेलें ॥२॥ नामा ह्मणे माझी खेचर माउली । कृपेनें दाविली वाट मज ॥३॥