भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णा पांच खासा उथळ दिसती । लाहानाल्या भिंती त्याजवरी

krushna panch khasa uthal disati | lahanalya bhinti tyajavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्णा पांच खासा उथळ दिसती । लाहानाल्या भिंती त्याजवरी ॥१॥ विस्तू घालिताती गवत आंथरती । बडबड करीती अवघेजण ॥२॥ घालुनियां तूप हातीं घेती चाटू । करीती ॐ फटू अस्कवळ ॥३॥ लांकडाचें पाळें घेउनी बैसला । मिळालासे मेळा त्याजपुढें ॥४॥ एवढेंसें भांडें तांदूळ शिजविती । तुजला काय देती त्यांतूनियां ॥५॥ घडिघडी उठती घडिघडी बैसती । तें बाय श्रीपति आह्मां सांग ॥६॥ काय चतुराई असे त्या गोवळा । भावासी भुलला नामा म्हणे ॥७॥