भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण लोणी खाया गेला । येऊनि गोपीनें धरिला

krushna loni khaya gela | yeuni gopinen dharila

रचनाकार: संत जगमित्र · अभंग
कृष्ण लोणी खाया गेला । येऊनि गोपीनें धरिला ॥ मायेपाशी घेऊनि आली । तेथें कृष्ण पाहती जाली ॥ येथें कृष्ण येथे कृष्ण । जिकडे तिकडे अवघा कृष्ण ॥ ऐसे ऐश्वर्य रो माये । जगमित्र नागा पाहुनि धाये ॥