भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण अनुसंगें रंगली कामिनी । कामधामें गेलीं गुणां विरोनी

krushna anusangen rangali kamini | kamadhamen gelin gunan vironi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्ण अनुसंगें रंगली कामिनी । कामधामें गेलीं गुणां विरोनी ॥१॥ होती बहुत जन्में वियोगें शिणली । आप नाठवे पर सुखें मिनली ॥२॥ मनें करूनियां ये विषयांचे संकल्प । तंव ते अवघे होय कृष्णरूप ॥३॥ द्दष्टीं देखणें जें जें आवडे । वेणू बाहे तेथें उभे देहुडे ॥४॥ सुखशयनीं स्वप्नीं देखे सांवळा । कंठीं कौस्तुभ रुळे वरी वनमाळा ॥५॥ जीवें धांवूनि आलिंगीं प्रीति । तंव ते आर्ती होय कृष्णमूर्ती ॥६॥ देह परतोनी मागुते सांभाळी । तंव स्वयें सिद्ध आपण वनमाळी ॥७॥ नामया स्वामी जीविंचा जिवलगू । कृष्णसुखाचा सुखबाध अंतरंगू ॥८॥