भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलिया

krupechi sauli akhand ladhali | khechar mauli bhetaliya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलिया ॥१॥ आतां मज भय नाहीं पैं कोणाचें । जन्ममरणाचें दुःख गेलें ॥२॥ बंधमोक्षाची फिटली काळजी । समाधि लागली समाधीसी ॥३॥ नामा म्हणे माझें सर्वही साधन । खेचर चरण न विसंबे ॥४॥