भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनासी जातां मार्गीं टाकी पाय । अमर देह होय कळे त्यासी

kirtanasi jatan margin taki pay | amar deh hoy kale tyasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कीर्तनासी जातां मार्गीं टाकी पाय । अमर देह होय कळे त्यासी ॥१॥ आखेद तरी तेथें घडे हिंसा । जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥२॥ गंगा वाराणसी धरोनि पदरीं । चाललीसे नारी दोहींकडे ॥३॥ आमच्या बापाची ऐकावया कीर्ति । जाऊं म्हणोन घेती ऐक्य कधीं ॥४॥ कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी । असूं द्या अंतरीं गोष्ट हित ॥५॥ वर्‍हाडी धांवे जैसा प्रयोजनीं । तान्हेलें तें पाणी पुसावया ॥६॥ व्याकुळ तें एक चुकलें बाळक । त्या धांवे शोकें हांका मारी ॥७॥ अशी कथे जातां गंगा त्या चरणीं । म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥