भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेचरें केली माव लिंगावरी देउनि पाव । पहावया भाव नामयाचा

khecharen keli mav lingavari deuni pav | pahavaya bhav namayacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खेचरें केली माव लिंगावरी देउनि पाव । पहावया भाव नामयाचा ॥१॥ नामा तेथें आला देव नमस्कारिला । देखोन बोलला वचन त्यासी ॥२॥ लिंगावरोनि चरण काढाजी वहिले । दिसतां वरी भले करणीं न कळे ॥३॥ तंव येरू बोलिला नाम्या तूं भला । मज नाहीं कळला देव तुझा ॥४॥ जेथें नाहीं देव तेथें ठेवी पाव । सर्वज्ञ सदैव तूंची अससी ॥५॥ मीपणें भुललों मज नकळेची कांहीं । देव नसे ते ठायीं पाय ठेवीं ॥६॥ तंव नामा होय विचारिता शब्दांची कुसरी । पाहतां निर्धारीं सान नोहे ॥७॥ देवाविण ठाव हें बोलणेंची वाव । परतोनि संदेह पडला मज ॥८॥ आपुलें उमाणें आपण उमगावें । मजसी तारावें भवसागरीं ॥९॥ नामा धरी चरण अगाध तुमचें ज्ञान । आपुलें नाम कोण सांगा स्वामी ॥१०॥ येरु म्हणे खेचर विसा पैं जाण । लौकिका मिरविणें अरे नाम्या ॥११॥ नाम आणि रूप दोन्ही जया नाहीं । तोचि देव पाही येर मिथ्या ॥१२॥ जळ स्थळ आणि काष्ट हे पाषाण । पिंड ब्रह्मांड व्यापुन अपुरेणु। ॥१३॥ सर्वत्र साक्षभूत हें जाणोनि पाहो । खेचर म्हणे नाम्यातें अवघा देवो ॥१४॥