भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेचरापासी जाय पुससी सागसी तें आहे । येरा आणिका काय उमगेना

khecharapasi jay pusasi sagasi ten ahe | yera anika kay umagena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खेचरापासी जाय पुससी सागसी तें आहे । येरा आणिका काय उमगेना ॥१॥ जाय जाय वेगीं लवलाहे पाहें । खेचराचे पाय सोडूं नको ॥२॥ तो सांगेल तें उगलेंच घेई । आणिकाचे बाहीं पडूं नको ॥३॥ केशव म्हणे नामयाचा विठया भक्तराया । आलिंगुनी चहूं बाह्या दिधलें क्षेम ॥४॥