भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवाचें प्रेम नामयाचि जाणें । नाम्या ह्रदयीं असणें केशवातें

keshavachen prem namayachi janen | namya hradayin asanen keshavaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवाचें प्रेम नामयाचि जाणें । नाम्या ह्रदयीं असणें केशवातें ॥१॥ नामा तो केशव केशव तो नामा । अभिन्नत्व आम्हां केशवासी ॥२॥ नामा म्हणे केशवा दुजेपण नाहीं । परि प्रेम तुझ्या ठायीं ठेवियेलें ॥३॥