भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवाचे प्रतापें गोसावी होसी । दास्यत्व करोनि सर्वस्व पोशी

keshavache pratapen gosavi hosi | dasyatva karoni sarvasva poshi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवाचे प्रतापें गोसावी होसी । दास्यत्व करोनि सर्वस्व पोशी ॥१॥ अर्जुनाचा सारथी बळीचा सांगाती । द्रौपदीच्या आकांतीं धांवोनि पावे ॥२॥ चातका जलधरु मच्छा जीवन नीरु । प्रल्हादा कैवारु दास म्हणोनी ॥३॥ नामा म्हणे तुम्ही न करा आळसु । नाम मंत्र दिवसु अभ्यासिजे ॥४॥