भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवा माधवा गोविंदा गोपाळा । जेवी तूं कृपाळा पांडुरंगा

keshava madhava govinda gopala | jevi tun krupala panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवा माधवा गोविंदा गोपाळा । जेवी तूं कृपाळा पांडुरंगा ॥१॥ अच्युता वामना दशरथनंदना । जेवी तूं गा कृष्णा पांडुरंगा ॥२॥ कृष्णा विष्णु हरि मधुसूदन मुरारी । जेवी तूं नरहरी पांडुरंगा ॥३॥ ऐसी ग्लानि करितां विठ्ठल पावला । नैवेद्य जेविला नामयाचा ॥४॥