भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव नाम गाय माधव नाम गाय । विठ्ठल नाम गाय कामधेनु

keshav nam gay madhav nam gay | viththal nam gay kamadhenu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव नाम गाय माधव नाम गाय । विठ्ठल नाम गाय कामधेनु ॥१॥ वेणुवादीं चरे पाणी पी भीवरें । ती गाय हंबरे भक्तालागीं ॥२॥ भक्तीसुखें धाय प्रेमें तें पान्हाय । भुकेलिया खाय पातकासी ॥३॥ नामा म्हणे गाय पंढरीसी आहे । पापिया न साहे पाठीं लागे ॥४॥