भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव म्हणे नाम्या धन्य तुज फावलें । बरवें तुवां केलें आत्महित

keshav mhane namya dhanya tuj phavalen | baraven tuvan kelen atmahit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव म्हणे नाम्या धन्य तुज फावलें । बरवें तुवां केलें आत्महित ॥१॥ पुण्यपावन तीर्थें पाहिलीं सकळिक । प्रक्षाळिलीं पातकें वासनेचीं ॥२॥ धन्य तुवाम केलें जन्मोनि सार्थक । शोक मोह दुःख निवारिलें ॥३॥ तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण । करी का उद्यापन विधियुक्त ॥४॥ केलिया कष्टाचेम होईल सार्थक । सांगेन तें ऐक वचन माझें ॥५॥ महा मुक्तिक्षेत्र वैकुंठ महीवरी । विख्यात पंढरी भूवैकुंठ ॥६॥ एक शीत अन्न अर्पे द्विजामुखीं । राहे सदा सुखी कल्पवरी ॥७॥ क्षेत्रवासी भावें पूजावे ब्राह्मण । षड्रस भोजन द्यावें त्यांसी ॥८॥ सुगंध चंदन सुमन तुळसीमाळा । समर्पी तांबुला सदक्षिणा ॥९॥ ऐसें बोलोनियां देवें नामा धरियेला करीं । राउळभीतरीं घेउनि गेले ॥१०॥ मग रुक्माईसी सांगे वैकुंठीचा राणा । आजी आराधना नामयाची ॥११॥