भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव म्हणतां क्लेश जाताती परते । त्याहुनि सरतें आणिक नाहीं

keshav mhanatan klesh jatati parate | tyahuni saraten anik nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव म्हणतां क्लेश जाताती परते । त्याहुनि सरतें आणिक नाहीं ॥१॥ वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी । उदंड वाचेसी हरी म्हणा ॥२॥ याहुनि पैं सार नाहीं हो दुसरें । भीष्में युधिष्ठिर उपदेशिला ॥३॥ नामा म्हणे धरा केशवीं विश्वास । तुटे गर्भवास नामें एकें ॥४॥