भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव कैवल्य कृपाळ । नारायणें उद्धरिला अजामेळ

keshav kaivalya krupal | narayanen uddharila ajamel

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव कैवल्य कृपाळ । नारायणें उद्धरिला अजामेळ । माधव मनीं धरा निश्चळ । गोविंद गोपाळ गोकुळींचा ॥१॥ विष्णु विश्वाचा जिव्हाळा । मधुसूदन माउली सकळां । त्रिविक्रमें रक्षिलें गोवळा । वामनें पाताळीं बळी नेला ॥२॥ श्रीधरें धरा धरिली पृष्ठीं । ह्रषिकेश उभा भीवरेतटीं । पद्मनाभ पुंडलिकासाठी । दामोदरें गोष्टी पांडवांशीं ॥३॥ संकर्षणें अर्जुनासी संवाद केला । वासुदेवें अवचितां वाळी वधिला । प्रद्युम्न समुद्रावरी कोपला । अनिरुद्धे छेदिला सहस्त्रबाहो ॥४॥ पुरुषोत्तमें केला पुरुषार्थ । अधोक्षजें हिरण्यकश्यपा मारिली लाथ । नरहरि प्रल्हादा रक्षित । स्मरावा अच्युत स्वामी माझा ॥५॥ जनार्दनें रावणादि वधिले । उपेंद्रें अहिल्येसी उद्धरिलें । हरि हरि म्हणताम दोष जळाले । कृष्णें तारिलें गणिकेसी ॥६॥ या चोवीस नामांचें करितां स्मरण । जन्ममरणांचे होय दहन । विष्णुदास नामा करी चिंतन । चरण ध्यान मज देई ॥७॥