भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण

kay panduranga sang myan karaven | sharan kona javen tumhanvin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥ वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥ ऐकिली म्यां कानीं कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणें ॥३॥ अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंत खूण सांगसी तूं ॥४॥ नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडें दाखवा नेटें पाटें ॥५॥