भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय म्यां बोलावें किती माझी मति । तुम्ही रमापति गोड केलें

kay myan bolaven kiti majhi mati | tumhi ramapati god kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय म्यां बोलावें किती माझी मति । तुम्ही रमापति गोड केलें ॥१॥ विश्वरूप घडी उघडिली धडफुडी । आतां काय थोडी कृपा म्हणूं ॥२॥ चिन्म्य लहरी येती उन्मळुनी । दया नारायणीं थोर केली ॥३॥ समाधि चरित्र केलें यथामति । रखूमाईचा पति आर्जविला ॥४॥ समाधि चरित्र जो करील श्रवण । तयालागीं पेणें वैकुंठीचें ॥५॥ नामा म्हणे देवगुरु धरील चित्तीं । उद्धरील पति रुक्माईचा ॥६॥