भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय माझा आतां पाहातोसी अंत । येईं बा धांवत देवराया

kay majha atan pahatosi ant | yein ba dhanvat devaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय माझा आतां पाहातोसी अंत । येईं बा धांवत देवराया ॥१॥ माझ्या जीवा होय तुजविण आकांत । येईं बा धांवत देवराया ॥२॥ असे जरी काम भेटूनियां जात । येईं बा धांवत देवराया ॥३॥ येरे देवा आतां नामा तुज बाहात । येईं बा धांवत देवराया ॥४॥