भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूनि तीर्थाटणें । मन भरिलें अवगुणें

kay karuni tirthatanen | man bharilen avagunen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय करूनि तीर्थाटणें । मन भरिलें अवगुणें ॥१॥ काय करावें तें तप । चित्तीं नाहीं अनुताप ॥२॥ मन:संकल्पाचीं पापें । न जाती तीर्थाचेनि बापें ॥३॥ नामा म्हणे सर्व सोपें । पाप जाय अनुतापें ॥४॥