भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करुं आतां देवा विश्वंभरा । मजलागीं थारा नाहीं कोठें

kay karun atan deva vishvambhara | majalagin thara nahin kothen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय करुं आतां देवा विश्वंभरा । मजलागीं थारा नाहीं कोठें ॥१॥ उबगति सोयरीं धायरीं समस्त । कय करुं अंत पाह्सी माझा ॥२॥ तूंचि मातापिता गुरुबंधू होसी । जाऊं मी कोणासी शरण आतां ॥३॥ पायीं थारा मागे नाम्याची विनंति । चित्त द्या श्रीपति आतां वेगे ॥४॥