भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौतुकानें तेथें आले सावकाश । उभे हरिदास कीर्तनासी

kautukanen tethen ale savakash | ubhe haridas kirtanasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कौतुकानें तेथें आले सावकाश । उभे हरिदास कीर्तनासी ॥१॥ दहा दिवस तेथें राहियेले स्वस्थ । अवघ्यांचा मनोरथ पूर्ण जाला ॥२॥ क्षेत्रींचा महिमा पुसिती देवासी । जना आगळी काशी सांगियेली ॥३॥ येथोनियां वाट जाते वाराणसी । मुनि आणि ऋषि आनंदले ॥४॥ नामा म्हणे देवा दिवस जाले फार । लागेल उशीर समधीसी ॥५॥