भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथें

kariti gayan ramakrushnahari | gokulinchya nari jati tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथें ॥१॥ शंख नामा तेथें आलासे गुह्यक । नाहीं त्या विवेक पापि-यासी ॥२॥ उपजला काम तयाचिया मना । घालोनी विमाना स्त्रिया नेत ॥३॥ धांव धांव रामा नेतसे हा आह्मां । अगा मेघश्यामा कृष्णनाथा ॥४॥ नेतो स्त्रिया काय न कळेचि देवा । यासी करूं द्यावा अपराध ॥५॥ हातीं वृक्ष दोघे ऐसें पाहोनियां । टाकोनी तो स्त्रिया पळतसे ॥६॥ घालितांचि वृक्ष प्राणासी मुकला । मणी त्याचा दिल्हा बळीभद्रा ॥७॥ भक्तांसाठीं मारी दुष्टां जगजेठी । नामा ह्मणे तुटी विसरेना ॥८॥