भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितसे स्नान अजाचा बाळक । वस्त्रें अमोलिक परि-धान

karitase snan ajacha balak | vastren amolik pari-dhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करितसे स्नान अजाचा बाळक । वस्त्रें अमोलिक परि-धान ॥१॥ लावोनियां भाळीं कस्तुरी केशर । करी नमस्कार वसिष्ठासी ॥२॥ पुण्याहवचनीं बैसे दशरथ । त्रिभुवनीं समर्थ तूंचि एक ॥३॥ वेदमंत्र घोष करिती ऋषेश्वर । पुष्पें सुरवर वरु-षती ॥४॥ आणिती बाहेर अयोध्येचे जन । करिती गायन गायक जे ॥५॥ नाचती अप्सरा वाजती नगारें । वाजंत्री तुतारे भोंवारे ही ॥६॥ गुलालाची धूम रंग वस्त्रावरी । बंदीजन द्वारीं गर्जताती ॥७॥ नामा ह्मणे इंद्रें पाहोनियां सभा । नाहीं ऐसी शोभा चित्तीं ह्मणे ॥८॥