भजनी मालिका
← भजनांकडे परत

कपाळीं कपाळ लावी चुंबी रडे । आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी

kapalin kapal lavi chumbi rade | akrandoni pade pruthvivari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कपाळीं कपाळ लावी चुंबी रडे । आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥ आवडीचें चिन्ह सांगवेना वाचे । जाणावें जयांचें त्यांचें त्यांनी ॥२॥ मानेवरी मान टाकूनि राहिली । वाचाही खुं-टली बोलवेना ॥३॥ आह्मी तुजविण नें राहूं क्षणभरी । उदास न करीं चित्त आतां ॥४॥ नामा ह्मणे मृगजन्म त्यांचा खरा । लक्षितां विचारा ज्ञानी बहू ॥५॥